डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

वसईमध्ये भर रस्त्यात तरुणीचा हत्या

वसईमध्ये आज भर रस्त्यात एका तरुणानं एका मुलीवर वार करत तिची हत्या केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून आरोपीला वालीव पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे निर्देश मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तांना दिले असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं. सखोल तपास करुन, न्यायालयात भक्कम पुराव्यानिशी बाजू मांडून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल, यादृष्टीनं निर्देश दिले असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमधे म्हटलं आहे.

आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल, असं आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सांगितलं. मुलांचं असं हिंसक वागणं, हत्या करण्यापर्यंत मजल जाणं आणि हे घडत असताना लोकांनी बघ्याची भूमिका घेणं चिंताजनक आहे, असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमधे म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.