भारतासोबत लवकरच एक खूप मोठा करार करण्यात येणार असल्याचं काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं. अमेरिकेनं चीनसोबत एक करार केला असून लवकरच भारतासोबत एक मोठा करार होईल. इतर कोणत्याही देशासोबत करार केले जाणार नाहीत, असं ट्रम्प यांनी ठामपणे सांगितलं. मात्र, त्यांनी चीनशी झालेल्या कराराबाबत अधिक माहिती दिली नाही.