डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

हिमाचल प्रदेशात ढगफुटीमुळे झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, ५५ जण बेपत्ता

हिमाचल प्रदेशात काल रात्री तीन ठिकाणी झालेला मुसळधार पाऊस आणि ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं वृत्त आहे. त्यानंतर आलेल्या पुरात ५५ जण बेपत्ता झाले असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. या ढगफुटीमुळे शिमला जिल्ह्यात ३६ जण तर मंडी जिल्ह्यात ९ जण बेपत्ता झाले असून २ मृतदेह सापडले आहेत, अशी माहिती उपायुक्त अनुपम कश्यप यांनी दिली. शिमल्याच्या रामपूर उपविभाग प्रशासनानं एनडीआरएफ आणि सीआयएसएफ च्या तुकड्यांच्या मदतीनं बचावकार्य सुरु केल्याचं त्यांनी सांगितलं.