विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १४ उमेदवारांचे एकूण २४ अर्ज दाखल

विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीचे अर्ज भरायचा आज शेवटचा दिवस होता. अखेरच्या दिवसापर्यंत ११ जागांसाठी १४ उमेदवारांनी एकूण २४ अर्ज भरले आहेत. भाजपाच्या पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांनी आज अर्ज भरले.  राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे, शिवसेनेकडून माजी खासदार कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांनी अर्ज भरला. काँग्रेसकडून प्रज्ञा सातव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मिलिंद नार्वेकर यांनीही अर्ज भरला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. 

याशिवाय अजयसिंग सेनगर आणि अरुण जगताप या अपक्ष उमेदवारांनीही अर्ज भरले आहेत. या अर्जांची छाननी उद्या होणार असून ५ जुलैपर्यंत अर्ज मागे घेता येतील. १२ जुलै रोजी मतदान होऊन त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होणार आहे.