June 27, 2025 2:10 PM | karantak

printer

कर्नाटकमधे चामराजनगर जिल्ह्यातल्या मलय महादेश्वर अभयारण्यात एक वाघीण आणि तिचे चार बछडे मृतावस्थेत आढळले

कर्नाटकमधे चामराजनगर जिल्ह्यातल्या मलय महादेश्वर अभयारण्यात एक वाघीण आणि तिचे चार बछडे मृतावस्थेत आढळले आहेत. वाघांना मारण्यासाठी आमिष म्हणून गायीच्या मृतदेहात विष मिसळण्यात आलं असावं, असा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. राज्याच्या वनमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. कर्नाटक ५६० हून अधिक वाघांसह देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे .