डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

उत्तर काश्मिर : सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार

उत्तर काश्मिरच्या बांदीपूर जिल्ह्यातल्या अरगामा इथं सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या परिसरात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर लष्कर, केंद्रीय राखीव पोलिस आणि जम्मू काश्मिर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. दहशतवादी लपलेल्या ठिकाणी सुरक्षा दलाचं पथक गेलं असता त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. दहशतवाद्यांना सुरक्षा दलाच्या पथकानं चोख प्रत्युत्तर दिलं. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला.