अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन आणि इस्राईलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यान्याहू यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी इस्राईलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यान्याहू यांच्याशी काल रात्री दूरध्वनीवरून चर्चा केली. सुमारे अर्ध्या तासाची ही चर्चा थेट आणि महत्त्वपूर्ण होती असं व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे. लेबनानमधील विशेषतः बैरुतमधील सर्वसामान्य नागरिकांना कमीत कमी हानी पोचेल अशी दक्षता घेण्याची सूचना बायडन यांनी केली. हल्ल्यांमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितहानीबद्दल बायडन यांनी चिंता व्यक्त केली.