शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पुतळ्याचे शिल्पकार आणि बांधकाम सल्लागारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

महाराष्ट्रात राजकोट इथला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नौदलाच्या दोन अधिकाऱ्यांनी काल मालवणला भेट देऊन पहाणी केली. या पुतळ्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागानं २० ऑगस्ट रोजी नौदलाला पत्र लिहून पाऊस आणि खाऱ्या वाऱ्यांमुळं पुतळ्याची जोडणी गंजल्याची बाब अधोरेखित केली होती. दरम्यान या प्रकाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं आज मालवण बंदची हाक दिली आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.