डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

इक्विटी कॅश विभागातील वैयक्तिक इंट्रा-डे ट्रेडर्सपैकी 70 टक्क्यांहून अधिक ट्रेडर्सचं नुकसान झालं असल्याचं SEBI चा अभ्यास

2022-23 या आर्थिक वर्षात इक्विटी कॅश विभागातील वैयक्तिक इंट्रा-डे ट्रेडर्सपैकी 70 टक्क्यांहून अधिक ट्रेडर्सचं नुकसान झालं असल्याचं SEBI ने केलेल्या एका अभ्यासात आढळून आलं आहे. एकाच दिवसात समभागांची खरेदी आणि विक्री करणे याला इंट्रा-डे ट्रेडींग म्हणतात. आर्थिक वर्ष 2018-19 च्या तुलनेत 2022-23 या आर्थिक वर्षात इक्विटी कॅश विभागामध्ये इंट्रा-डे ट्रेडिंगमध्ये भाग घेणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत 300 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचंही या अभ्यासात नमूद करण्यात आलं आहे. अहवालानुसार, इक्विटी कॅश विभागामध्ये व्यापार करणाऱ्या तीनपैकी एक व्यक्ती इंट्राडे व्यवहार करते. तोटा होणाऱ्या व्यापारांची सरासरी संख्या नफा मिळवणाऱ्यांपेक्षा जास्त आहे. 2018-19 च्या तुलनेत 2022-23 मध्ये 30 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या तरुण इंट्रा-डे ट्रेडर्सचा वाटा 48 टक्क्यांपर्यंत वाढला आहे 2022-23 या आर्थिक वर्षात तरुण व्यापाऱ्यांमध्ये तोटा होणाऱ्यांची टक्केवारी 76 टक्के होती, असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.