August 28, 2024 9:13 AM | CM Eknath Shinde

printer

‘लाडक्या बहिणी’ प्रमाणेच ‘सुरक्षित बहीण’ ही जबाबदारी आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘लाडक्या बहिणी’ प्रमाणेच ‘सुरक्षित बहीण’ ही जबाबदारी देखील शासनाचीच आहे, शासन कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. काल ठाण्यात आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठान दहीहंडी उत्सवात ते बोलत होते. हे शासन गोविंदा पथकांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभं असून, गोविंदांसाठी जे जे शक्य आहे ते सर्व काही करण्यात येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.