आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात २१ जून रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त प्राचीन भारतीय संस्कृतीपासून ते त्याच्या जागतिक चळवळीपर्यंतचा योगसाधनेच्या प्रवासाचा आढावा घेऊया..
भारतीय संस्कृतीत एक आध्यात्मिक साधना म्हणून योगसाधनेची सुरुवात झाली. आणि हळूहळू आत्म-साक्षात्काराच्या दिशेने एक शिस्तबद्ध मार्ग म्हणून त्याचा विकास झाला. योगसाधनेचा उगम सुमारे ईसापूर्व ५०० सालादरम्यान झाला. कालांतराने, ही साधना एका समृद्ध शाखेत बहरली. ती वेद, उपनिषद आणि नंतर पतंजलीच्या योग सूत्रांमध्ये प्रवाहित झाली. स्वामी विवेकानंद आणि बी.के.एस. अय्यंगार या योगगुरुंनी १९ व्या आणि २० व्या शतकात योगचे पुनरुज्जीवन केलं. २०१४ मध्ये, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव सादर केला. तेव्हापासून, २१ जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. येत्या शनिवारी साजऱ्या होणाऱ्या ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना “एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग” ही आहे. जगभरात यादिवशी योगसाधनेवर आधारित अनेक कार्यक्रम होणार आहेत. योगदिनानिमित्त विशाखापट्टणम इथं होणाऱ्या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.
Site Admin | June 18, 2025 2:25 PM | International Yoga day | journey of yoga
प्राचीन भारतीय संस्कृतीपासून ते जागतिक चळवळीपर्यंतचा योगसाधनेच्या प्रवासाचा आढावा..
