अल्पसंख्याक विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत मंत्रालयात घेण्यात आली आढावा बैठक

राज्यातल्या अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राबवल्या जाणाऱ्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. मंत्रालयात आज अल्पसंख्याक विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.