खोल समुद्रातल्या संशोधनासाठी अर्थसंकल्पात सहाशे कोटी रुपयांची तरतूद

भारताच्या खोल समुद्रातील महत्त्वाकांक्षी मोहिमेसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सहाशे कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. यामुळे समुद्रात सहा हजार मीटर खोल संशोधन करण्यासाठी, विशेषत्वाने तयार कऱण्यात आलेल्या पाणबुडी पाठवण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. चेन्नईतल्या राष्ट्रीय सागरी उद्योग संस्थेने ही पाणबुडी तयार केली आहे. या वर्षी ही पाणबुडी 500 मीटर खोल पाठवून संशोधन करण्यात येईल. पुढल्या वर्षी ती 6 हजार मीटर खोलपर्यंत पाठवण्याचा वैज्ञानिकांचा प्रयत्न असेल. त्याशिवाय पृथ्वी विज्ञान मंत्रालयासाठीही अर्थसंकल्पात एक हजार 329 कोटी रुपयांची तरतूद कऱण्यात आली आहे. त्यामुळे हवामानाचा अचूक अंदाज व्यक्त करण्यास मदत होणार आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.