May 8, 2025 3:59 PM

printer

पंजाबमध्ये फिरोझपूर क्षेत्रात घुसखोरी करणारा एक पाकिस्तानी नागरिक ठार

पंजाबमध्ये फिरोझपूर क्षेत्रात घुसखोरी करणारा एक पाकिस्तानी नागरिक ठार झाल्याचं सीमा सुरक्षा दलानं सांगितलं. अंधाराचा फायदा घेत तो भल्या पहाटे सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान, अटारी, हुसेनीवाला आणि सदकी इथल्या सीमा बंद ठेवण्यात आल्या आहेत.