अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उपवर्गीकरणाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात देशभरात बंद पाळला जात आहे. बिहारमध्ये आरक्षण बचाव संघर्ष समितीने पुकारलेल्या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी आंदोलनकर्ते आणि पोलिसांत चकमकी झाल्या. विविध रेल्वेस्थानकांवर निदर्शनं झाल्यामुळं रेल्वे सेवा ठप्प झाली. याचा थेट परिणाम पोलीस भरतीसाठी जाणाऱ्या परीक्षार्थींवर झाला. पाटणामध्ये डाक बंगला परिसरात काही आंदोलनकर्त्यांची पोलीस कर्मचाऱ्यांशी झटापट झाल्यानं आंदोलनाला हिंसक वळण लागलं. महाराष्ट्रातही विविध ठिकाणी बंद पाळण्यात आला.
Site Admin | August 21, 2024 8:25 PM
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उपवर्गीकरणाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात देशभरात बंद
