डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

ओबीसींच्या शिष्टमंडळाची सरकारसोबत बैठक

जालना जिल्ह्यात ओबीसी समाजाच्या वतीनं लक्ष्मण हाके आणि त्यांच्या सहकाऱ्यानी सुरु केलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत ओबीसींच्या शिष्टमंडळाची सरकारसोबत बैठक सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि अजित पवार यांच्याशी ओबीसी नेते आणि शिष्टमंडळातले सदस्य चर्चा करत आहेत.

या बैठकीत मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ, मंत्री अतुल सावे, गिरीश महाजन, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, उदय सामंत, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री पंकजा मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्यासह ओबीसी समाजाचे सदस्य सहभागी झाले आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.