डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राज्यभरात तिरंगा यात्रांमध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग

 

हर घर तिरंगा अभियानांतर्गत आज नवी मुंबईतल्या विविध भागात तिरंगा यात्रा काढण्यात आल्या होत्या. या यात्रांमध्ये विद्यार्थी, महिला, युवक तसंच नागरिकांसह सायकलपटूही मोठ्या संख्यने सहभागी झाले होते.

 

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज नाशिक महापालिकेनं तिरंगा पदयात्रा आयोजित केली होती. या पदयात्रेदरम्यान स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा सत्कार करण्यासह हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकवण्याचं आवाहन नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या पदयात्रेदरम्यान केलं.

 

परभणी शहर महानगर पालिका, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमानं आज परभणी शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली होती. या रॅलीदरम्यान देशभक्तीपर गीतं वाजवून पोलीस बँड पथकानं सगळ्यांची मनं जिंकली.

 

अहमदनगर जिल्ह्यातही घरोघरी तिरंगा मोहीम राबवली जात आहे. त्यानिमित्त अहमदनगर महापालिकेनं आज तिथल्या भुईकोट किल्ला मैदानावर तिरंगा दौडचं आयोजन केलं होतं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.