डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

जम्मू-काश्मीरमध्ये एक काश्मिरी डॉक्टर आणि ६ बांधकाम कामगारांची हत्या

जम्मू-काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यात गगनगीर इथं दहशतवाद्यांनी एक काश्मिरी डॉक्टर आणि ६ बांधकाम कामगारांची हत्या केली. सोनमर्गच्या झेड-मोड बोगदा परिसरात बांधकामाच्या ठिकाणी ही घटना घडली. दोन दहशतवाद्यांनी एका खासगी कंपनीच्या खानावळीमध्ये घुसून गोळीबार केला. यावेळी मारले गेलेले डॉ.शहनवाज हे बडगाम जिल्ह्यातील नईदगाम इथले रहिवासी होते. गेल्या तीन दिवसांतील मजुरांवर झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा एन आय ए या प्रकारणाची चौकशी करीत आहे.

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. या घृणास्पद हाल्ल्याचे चोख उत्तर दिले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनीही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.