अमरनाथ यात्रेसाठी जम्मू मधल्या यात्रेकरूंची एक तुकडी काश्मीर खोऱ्याकडे रवाना

अमरनाथ यात्रेसाठी जम्मू मधल्या भगवती नगर यात्री निवास बेस कॅम्पमधून आज ४ हजार ८२१ यात्रेकरूंची आणखी एक तुकडी काश्मीर खोऱ्याकडे रवाना झाली. दीडशे वाहनांच्या ताफ्यासह यात्रेकरूंनी आज पहाटे बेस कॅम्प सोडला. यापैकी एक हजार ७३१ यात्रेकरू काश्मीर खोऱ्यातल्या बालताल बेस कॅम्पकडे, तर तीन हजार ९० यात्रेकरू पहेलगाव इथल्या बेस कॅम्प कडे रवाना झाले. तिथून पुढे ते अमरनाथ गुंफांकडे मार्गस्थ होतील.