राहुल गांधी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध बुलडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

गायकवाड यांच्या वक्तव्यावर रोष व्यक्त करत कॉंग्रेसनं बुलडाणा शहरात आंदोलन केलं. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.