भारताच्या विकासाची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प – चंद्रशेखर बावनकुळे

अतिशय सकारात्मक आणि भारताच्या विकासाची पायाभरणी करणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. 

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या भारताच्या विकासाला बळकटी देणारा आणि देशातल्या सर्व समाजघटकांच्या अपेक्षांची पूर्तता करणारा हा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

 

भारताच्या १०० शहरांमध्ये प्लग अँड प्ले औद्योगिक पार्कची निर्मिती करण्याच्या धोरणामुळे मोठे बदल घडतील तसंच यामुळे भारतातील उद्योग आणि उद्योजकतेला गती मिळेल, अशी प्रतिक्रिया राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.