डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन केलेल्या गोळीबारात BSF चा एक जवान जखमी

पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधी कराराचं उल्लंघन करत जम्मू – काश्मिरमध्ये अखनूर इथल्या नियंत्रण रेषेजवळील भारतीय चौक्यांवर विनाकारण गोळीबार केला. या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला. पाकिस्ताननं केलेल्या गोळीबाराला बीएसएफच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं.

 

मध्यरात्री अडीचच्या सुमारास नियंत्रण रेषेजवळ असलेल्या भारतीय चौक्यांवर गोळीबार केल्याची माहिती बीएसएफच्या प्रवक्त्यानं दिली. या घटनेनंतर जवानांना अधिक सतर्क राहण्याच्या तसंच सीमाभागातील गस्त वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.