नवी दिल्लीत आज ९ व्या भारत-ब्राझील संयुक्त आयोगाच्या बैठकीचं आयोजन

भारत आणि ब्राझील यांच्यात आज होणाऱ्या ९व्या संयुक्त आयोग बैठकीचं अध्यक्षपद परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि ब्राझीलचे परराष्ट्र मंत्री मौरो वीईरा संयुक्तपणे भुषवतील. मौरो वीईरा हे चार दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत. त्यांच्या भेटीमुळे भारत आणि ब्राझीलमधल्या राजनैतिक संबंधांना चालना मिळेल, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. 

ब्राझील यावर्षी होणाऱ्या जी २० परिषदेचं अध्यक्षपद भूषवणार आहे. ब्राझीलच्या या अध्यक्षपदाच्या काळात तीन गटांच्या समूहात भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे. भारत आणि ब्राझील यांच्यात अनेक वर्षांपासूनचे संबंध असून वीईका यांच्या भेटीमुळे हे संबंध अधिक दृढ होणार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.