९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप

९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप होत आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ गुजराती  साहित्यिक रघुवीर चौधरी, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. आज दिवसभरात संमेलनात,पुस्तक चर्चा,मुलाखत,कविसंमेलन,परिसंवाद आणि रात्री सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहे .