September 14, 2025 4:07 PM

printer

९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड

सातारा इथं होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या आज पुण्यात झालेल्या बैठकीत एकमतानं ही निवड झाल्याचं महामंडळाचे सदस्य प्राध्यापक रामचंद्र काळुंखे यांनी आकाशवाणीला सांगितलं. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असतील. 

 

पानिपत, पांगिरा, संभाजी, झाडाझडती यासह अनेक कादंबऱ्याचं लेखन विश्वास पाटील यांनी केलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.