डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

देशभरात ९८ हजार ठिकाणी बीएसएनएल 4G यंत्रणा बसवण्याची केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची घोषणा

देशभरात सुमारे ९८ हजार ठिकाणी बीएसएनएल फोर जी यंत्रणा बसवण्याची घोषणा केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज माध्यमांसमोर केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या त्याचं उद्घाटन करतील. ही यंत्रणा नंतर फाय-जीमध्ये रुपांतरित केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. देशातल्या प्रत्येक भागात ही यंत्रणा बसवली जाईल. डिजिटल भारत निधीद्वारे देशात १०० टक्के फोरजी सॅच्युरेशन नेटवर्कचं अनावरण देखील शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. या नेटवर्कच्या माध्यमातून ३० हजार गावं जोडली गेली आहेत.