डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

April 24, 2025 9:20 PM

printer

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेत सर्वपक्षीय बैठक संपली

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं बोलावलेली सर्वपक्षीय बैठक नवी दिल्लीत संसद भवन संकुलात सुरू आहे. बैठकीच्या सुरुवातीला २ मिनिटे मौन पाळून मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बैठकीच्या अध्यक्षस्थानी असून, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, द्रमुकचे तिरुची शिवा, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे, समाजवादी पार्टीचे राम गोपाल यादव, आम आदमी पक्षाचे संजय सिंह, राष्ट्रीय जनता दलाचे प्रेमचंद गुप्ता, वायएसआर काँग्रेसचे पी. व्ही. मिधुन रेड्डी, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय इत्यादी नेते या बैठकीला उपस्थित आहेत.

श्रीनगरमध्येही आज सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीत या हल्ल्याचा एकमुखी निषेध करण्यात आला आणि हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सरकार करत असलेल्या सर्व प्रयत्नांना पाठिंबा देण्याचा ठराव एकमतानं मंजूर झाला. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा