प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दूरसंचार क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आणि सुमारे ३७ हजार कोटी रुपये खर्चाच्या ९७ हजार ५०० पेक्षा जास्त मोबाईल 4G टॉवर्सचं उद्घाटन दूरस्थ पद्धतीनं केलं. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण पुण्यात करण्यात आलं, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. 4Gच्या माध्यमातून गावागावांपर्यंत संपर्काव्यवस्था उभी राहत आहे, याद्वारे नागरिकांना आवश्यक सेवा येत्या दोन महिन्यात सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. देशभरात ९२ हजारपेक्षा जास्त टॉवर उभारण्यात येणार असून त्यातले ९ हजार २० टॉवर महाराष्ट्रात आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या क्षेत्रात भारतानं आपलं सामर्थ्य दाखवून दिल्याचं ते म्हणाले.
Site Admin | September 27, 2025 3:20 PM
4G मोबाईल सेवेसाठी राज्यात ९ हजार २० टॉवर उभारण्यात येणार