आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भ अटींनाही काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना करण्यात आली असून, अठरा महिन्यांच्या आत आयोग शिफारशी करेल. याचा लाभ 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे. विविध मंत्रालयं, राज्य सरकारे यांच्याशी चर्चा केल्यानंतर या संदर्भ अटी निश्चित केल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.
Site Admin | October 29, 2025 9:30 AM | 8th Pay Commission
आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भ अटींना मान्यता