८२ युवा कलाकारांचा उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्काराने सन्मान

२०२२ आणि २०२३ या वर्षांसाठीचे उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार आज नवी दिल्लीत सांस्कृतिक खात्याचे सचिव अरुणिश चावला यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. पुरस्कार मिळालेल्यांत अनुजा झोकरकर, सारंग कुलकर्णी आणि नागेश अडगावकर यांचा समावेश आहे. संगीत, नृत्य, नाट्य, लोककला, आदिवासी कला आणि कठपुतळी नृत्य क्षेत्रातील ८२ युवा कलाकारांना २५ हजार रोख रुपये आणि मानपत्र देऊन सन्मानित केलं. २००६ मध्ये संगीत नाटक अकादमीनं युवा कलाकारांसाठी हे पुरस्कार सुरू केले.