सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून चालताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देशाच्या सर्व समावेशक प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे. केंद्र सरकारने आरोग्य सेवेसाठी डिजिटल परिसंस्थेला मजबूत केलं असून त्यामुळे आरोग्य सेवेचे लाभ अधिक सुलभतेने मिळत आहेत.
भारताच्या आरोग्य सेवेत डिजिटल परिवर्तन घडून येत आहे. विविध सरकारी उपक्रम, धोरणात्मक सुधारणा, तांत्रिक प्रगती यांचा एकत्रित परिणाम आरोग्य सेवेवर दिसत आहे. वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि दर्जेदार आरोग्य सेवेची वाढती मागणी यांचा ताळमेळ साधण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०२१ मध्ये आयुष्मान भारत डिजिटल मिशन सुरू केलं होतं. याचा उद्देश खासगी आणि सार्वजनिक क्षेत्राच्या सक्रिय सहकार्यातून एक मजबूत आरोग्य परिसंस्थेची निर्मिती करणं हा होता. २०२१ ते २०२६ या पाच वर्षांत ८० कोटींहून अधिक आयुष्मान भारत आरोग्य खाती तयार करण्यात आली आहेत, या खात्यांच्या माध्यमातून ७१ कोटींहून अधिक आरोग्य नोंदी घेतल्या गेल्या आहेत.
याच अभियानाचा एक भाग असलेला ई-संजीवनी हा एक अत्याधुनिक क्लाउड-आधारित टेलिमेडिसिन प्लॅटफॉर्म आहे. देशभरातल्या आरोग्यसेवा पुरवठादार आणि रुग्णांमध्ये दूरस्थ पद्धतीने वैद्यकीय मदतीसाठीच्या मार्गदर्शनाचा फायदा ई-संजीवनीमुळे मिळाला आहे.)