डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राज्यातल्या ८ वैद्यकीय महाविद्यालयांना राष्ट्रीय आरोग्य विज्ञान विभागाची मान्यता

राज्यातल्या एकूण आठ वैद्यकीय महाविद्यालयांना अटी आणि शर्तीच्या अधीन राहून राष्ट्रीय आरोग्य विज्ञान विभागानं मान्यता दिली असून, याच सत्रापासून ही आठही महाविद्यालयं सुरू होणार आहेत. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज बुलढाणा इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.

 

या आठ वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रत्येकी १०० याप्रमाणे ८०० वैद्यकीय प्रवेशांमुळे देशातली एकूण प्रवेश संख्या एक लाख १६ हजार ६१२ एवढी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या दहा वर्षात वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल झाला असल्याचं ते म्हणाले. ऍलोपॅथी औषधी उपचार पद्धतीप्रमाणे आयुर्वेदात रिफंड योजना लागू केली जाणार आहे. त्यासाठी १७० औषधांच्या पॅकेजवर सध्या काम सुरू असून लवकरच ही योजना लागू होईल, असं प्रतापराव जाधव यांनी सांगितलं.