डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

चीन मधील शाळेत झालेल्या चाकू हल्ल्यात 8 जण ठार

चीन मधील शाळेत झालेल्या चाकू हल्ल्यात 8 जण ठार तर 17 जण जखमी
चीन मधील जिआंगसू प्रांतातील एका शाळेत काल झालेल्या चाकू हल्ल्यात 8 जण ठार तर 17 जण जखमी झाले. जू या 21 वर्षीय संशयिताला घटनास्थळी पकडण्यात आलं असून त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यानं प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे आणि कमी विद्यावेतन मिळाल्याच्या रागामुळे त्याने हे कृत्य केलं असल्याची माहिती तिथल्या पोलिसांनी दिली. बचावकार्य सुरू असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. चीनमध्ये या आठवड्यात, नागरिकांवर झालेला हा दुसरा हल्ला आहे.