भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने होणारा राज्यातला मुख्य शासकीय सोहळा उद्या मुंबई इथं मंत्रालयात होणार आहे. सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. पुणे इथं राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. ठाणे इथं जिल्हा मुख्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तर बीड इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. नाशिक इथं राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते तर रायगड जिल्ह्यात राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
Site Admin | August 14, 2025 3:34 PM | 79th Independence Day
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मुख्य शासकीय सोहळा उद्या मुंबई इथं मंत्रालयात होणार
