डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

७६व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशोदेशीच्या नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल प्रधानमंत्र्यांनी मानले आभार

देशाच्या ७६व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जागतिक नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आभार व्यक्त केले आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. ही घटना दोन्ही देशांमधलं धोरणात्मक सहकार्य आणि दीर्घ मैत्रीचं प्रतीक होतं, असं मोदी यांनी मॅक्रॉन यांच्या समाजमाध्यमावरच्या पोस्टला उत्तर देताना म्हटलं आहे. आयर्लंडचे प्रधानमंत्री मायकल मार्टिन यांनी समाजमाध्यमावर दिलेल्या शुभेच्छा संदेशालाही प्रधानमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यातले संबंध लोकशाहीवरच्या विश्वासावर उभे आहेत आणि भविष्यात ते आणखी बळकट होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.