राज्यातील प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेच्या ७५ टक्के लाभार्थ्यांना देण्यात आलाय ओळख क्रमांक

राज्यातल्या शेतकऱ्यांना जमीन मालकीचा पुरावा तसंच ओळख क्रमांक देण्यासाठी ॲग्रिस्टॅक योजना राबवण्यात येत आहे. या योजनेचा आतापर्यंत ९१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. राज्यातील प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेच्या ७५ टक्के लाभार्थ्यांना ओळख क्रमांक देण्यात आल्याची माहिती पुणे भूमी अभिलेख संचालक डॉक्टर सुहास दिवसे यांनी दिली. अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांना ओळख क्रमांक दिले असून त्यानंतर पुणे जिल्ह्याचा क्रमांक आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.