डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

७२ व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा आज हैदराबादमध्ये होणार

७२ व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा आज हैदराबादमधल्या इनडोअर स्टेडियममध्ये होणार आहे. 3 आठवडे ही स्पर्धा चालणार आहे. मिस वर्ल्डच्या ७३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ही स्पर्धा  एकाच देशात सलग दोन वेळा होत आहे.

 

याआधीची ७१ वी मिस वर्ल्ड गेल्या वर्षी मार्चमध्ये मुंबईत आयोजित करण्यात आली होती. मिस वर्ल्ड स्पर्धेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ज्युलिया मोर्ले यांनी यावर्षी फेब्रुवारीमध्ये तेलंगणामध्ये ही स्पर्धा आयोजित करण्याची घोषणा केली होती. ३१ मे रोजी या स्पर्धेचा समारोप होईल.