डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

नाळ २, श्यामची आई आणि आत्मपॅम्पलेट चित्रपटांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर

७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार ‘नाळ २’ तर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार ‘श्यामची आई’ चित्रपटाला जाहीर झाला आहे. नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार आशिष बेंडे यांना ‘आत्मपॅमफ्लेट’ साठी जाहीर झाला आहे. नवी दिल्लीत झालेल्या वार्ताहर परिषदेत निवड समितीचे अध्यक्ष आशुतोष गोवारीकर यांनी हे पुरस्कार जाहीर केले. 

 

सर्वोत्कृष्ट बाल कलाकारांचा पुरस्कार जिप्सीसाठी कबीर खंदारे, नाळ २ साठी त्रीशा ठोसर, श्रीनिवास पोकळे आणि भार्गव यांना मिळाला आहे. 

 

12th fail हा राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आणि या चित्रपटातला अभिनेता विक्रांत मेस्सी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विभागून जाहीर झाला आहे. जवान चित्रपटासाठी शाहरुख खान यालाही सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार चॅटर्जी वर्सेस नॉर्वेसाठी राणी मुखर्जीला मिळणार आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकालाचा पुरस्कार द केरळ स्टोरीचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांना जाहीर झाला. याशिवाय सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कारही याच चित्रपटाला मिळाला. शिल्पा राव सर्वोत्कृष्ट गायिका आणि PVNS रोहित सर्वोत्कृष्ट गायक ठरला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा