डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

बिहारमधल्या सिद्धेश्वरनाथ मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ७ भाविकांचा मृत्यू

बिहारमधल्या जहानाबाद जिल्ह्यातल्या सिद्धेश्वरनाथ मंदिरात काल मध्यरात्री झालेल्या चेंगराचेंगरीत सात भाविकांचा मृत्यू झाला असून १६ हून अधिक जण जखमी झाले आहेत. भाविक आणि स्थानिक दुकानदार यांच्यात मध्यरात्री एक वाजता भांडण झाल्यामुळे चेंगराचेंगरी होऊन ही दुर्घटना झाली, असं जहानाबादचे पोलीस निरीक्षक अरविंद प्रताप सिंह यांनी सांगितलं. मंदिराचा परिसर अरुंद असल्यामुळे गर्दी नियंत्रणात आणणं शक्य झालं नाही असं म्हणाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

 

मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर

 

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना चार लाख तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.

 

Image