सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कार केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी आज जाहीर केले. जलसंवर्धन आणि व्यवस्थापनात सर्वोत्तम राज्याचा पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर झाला आहे. गुजरात आणि हरियाणाला अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. सर्वोत्तम नागरी स्थानिक स्वराज संस्था या श्रेणीत नवी मुंबई महानगरपालिकेला प्रथम क्रमांक मिळाला आहे. सर्वोत्तम पाणी वापरणारी संस्था श्रेणीत नाशिकच्या काफिनाथ संस्थेला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
नवी दिल्लीत विज्ञान भवन इथं १८ नोव्हेंबरला पुरस्कार प्रदान सोहळा होणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार दिले जाणार आहेत. पुरस्कार विजेत्यांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम पुरस्कार म्हणून दिली जाणार आहे.