संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह आणि व्हिएतनामच्या संरक्षण दलाचे उपप्रमुख वरिष्ठ लेफ्टनंट जनरल फुंग सी तान यांच्या उपस्थितीत भारत-व्हिएतनाम सैन्य सराव विनबॅक्स च्या सहाव्या आवृत्तीचे उद्घाटन आज हनोई येथे झाले.
या द्विपक्षीय लष्करी सरावाचा उद्देश संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांतील सर्वोत्तम पद्धतींचा आदानप्रदान आणि दोन्ही देशांमधील परस्पर कार्यक्षमता तसेच संरक्षण सहकार्य मजबूत करणे हा आहे.