January 27, 2025 8:16 PM

printer

गोल्डन ट्रँगल सेझमधल्या सायबर गुन्हे केंद्रातून ६७ भारतीयांची सुटका

लाओसमधल्या भारतीय दूतावासाने गोल्डन ट्रँगल सेझमधल्या सायबर गुन्हे केंद्रातून ६७ भारतीयांची सुटका केली आहे. या तरुणांना धमकावून आणि त्यांच्यासोबत गैरवर्तन करून त्यांना या गुन्ह्यांमध्ये सहभागी होण्यासाठी भाग पाडलं गेल्याचं दुतावासाने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. या तरुणांच्या सुटकेसाठी दुतावासाच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आणि त्यांची तिथून सुटका केली.

 

लाओसमधले भारतीय राजदूत प्रशांत अग्रवाल यांनी सुटका झालेल्या तरुणांची भेट घेऊन त्यांना भारतात सुरक्षितपणे पाठवण्याचं तसंच फसवणूक करणाऱ्या एजंटविरुद्ध तक्रारी दाखल करण्याचं आश्वासन दिलं आहे. दुतावासाने आतापर्यंत ९२४ भारतीयांची सुटका केली असून त्यापैकी ८५७ भारतीय यापूर्वीच भारतात परतले आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.