दुष्काळी भागात मनरेगाचा ६५ टक्के निधी पाणी पुरवठा योजनांसाठी खर्च केला जाईल, अशी घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे. ते काल बीड जिल्ह्यात शिरसाळा इथं शेतकरी संवाद मेळाव्यात बोलत होते. शेतकऱ्यांचं उत्पन्न एवढं वाढवायचं आहे की, एकाही शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागू नये, हे आपलं उद्दीष्ट असल्याचं चौहान यांनी सांगितलं.
ग्लोबल विकास ट्रस्टनं केलेलं काम पाहिल्यानंतर शेतकऱ्यांच्या जीवनात खरोखरच आर्थिक क्रांती घडू शकते हा विश्वास वाटत असल्याचं नमूद करत, केंद्र सरकार ग्लोबल विकास ट्रस्टसोबत मिळून काम करेल, अशी ग्वाही चौहान यांनी दिली. ग्लोबल विकास ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मयंक गांधी यांनी यावेळी बोलताना, केंद्र सरकारनं संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांना धीर द्यावा अशी विनंती केंद्रीय कृषिमंत्र्यांना केली.