तेलंगणामध्ये ६४ माओवाद्यांचं आत्मसमर्पण

तेलंगणा मध्ये बंदी घातलेल्या भारतीय कम्युनिस्ट पार्टी- माओवादी या संघटनेच्या ६४ सदस्यांनी आज भद्रादि कोठागुडम जिल्ह्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. यात ४८ पुरुष तर १६ महिला माओवाद्यांचा समावेश आहे. यामुळे गेल्या दोन महिन्यात आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांची संख्या १२२ वर पोहोचली आहे.