64 वी सुब्रतो करंडक आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा येत्या 19 ऑगस्टपासून सुरू होणार. यामध्ये मुलं आणि मुली, ज्युनिअर आणि सबज्युनिअर अशा 3 श्रेणींमध्ये 106 संघ सहभागी होणार आहेत.
19 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर दरम्यान दिल्ली एनसीआर आणि बंगळूरू मध्ये या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. यामध्ये 4 परदेशी संघही सहभागी होणार आहेत. काल दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा करण्यात आली.