ब्राझीलमधल्या प्रवासी विमान कोसळून ६१ जणांचा मृत्यू

ब्राझीलमधल्या साओ पाऊलो शहराजवळ आज एक प्रवासी विमान कोसळून ६१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ब्राझीलच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. या विमानात ५७ प्रवासी आणि चार कर्मचारी प्रवास करत होते. या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबीयांविषयी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईज इनसीयो लुला डीसिल्वा यांनी सहवेदना व्यक्त केल्या आहेत.