डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

६१ नक्षली अतिरेक्यांचं गडचिरोली इथं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण

नक्षलवाद्यांच्या पॉलिट ब्युरोचा महत्त्वाचा सदस्य भूपती उर्फ मल्लोजुला वेणुगोपाल याच्यासह ६१ नक्षली अतिरेक्यांनी आज गडचिरोली इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रीतसर  आत्मसमर्पण केलं.  

 

२०१४ पासून राज्यात आपल्या सरकारने नक्षलवादाविरुद्ध उभारलेला लढा आज निर्णायक पद्धतीने समाप्तीकडे चालला आहे. असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले, आता फक्त काही मोजके नक्षलवादी बाकी असून तेही लवकरच आत्मसमर्पण करतील कारण त्यांना आता कोणीही नेता उरलेला नाही.

 

मार्च २०२६ देश नक्षलमुक्त करण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं उद्दिष्ट राज्याने वेळेआधीच पूर्ण केलं आहे, असं ही मुख्यमंत्री म्हणाले.