डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

हाथरस दुर्घटनाप्रकरणी 6 योजकांना अटक

उत्तरप्रदेशातील हाथरस इथ सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटने प्रकरणी 6 जणांना पोलिसांनी काल अटक केली. यामध्ये 4 पुरुष आणि दोन महिलांचा समावेश असून ते या सत्संग कार्यक्रम आयोजन समितीचे सदस्य आणि सेवादार आहेत.

 

अलिगड विभागाचे पोलिस अधिकारी शल्लभ मथुर यांनी ही माहिती दिली. या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रकाश मधुरकर हा फरार असून, त्याच्या बद्दल माहिती देणाऱ्या व्यक्तीला एक लाख रुपायांच बक्षिस जाहीर करण्यात आल आहे. हाथरस चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत 121 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.