डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

उत्तराखंडमध्ये खासगी हेलिकॉप्टर कोसळून ६ जणांचा मृत्यू

उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्यात गंगनानी इथे आज सकाळी एक खासगी हेलिकॉप्टर कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला असून १ जण गंभीर जखमी झाला आहे. या हेलिकॉप्टरमध्ये वैमानिकासह सात जण प्रवास करत होते. 

 

डेहराडून इथल्या सहस्रधारा हेलिपॅडवरून निघालेलं हे हेलिकॉप्टर चारधाम यात्रेकरूंना घेऊन गंगोत्री इथे निघालं होतं. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून घटनेच्या  चौकशीचे निर्देश दिले आहेत. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.