डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

December 22, 2024 1:09 PM | GST Council meeting

printer

पोषणयुक्त तांदळावरील कराचा दर कमी करण्याची जीएसटी परिषदेची शिफारस

जीएसटी परिषदेनं पोषणयुक्त तांदळावरील कराचा दर कमी करून पाच टक्के करण्याची आणि पाकिटबंद तसंच लेबल केलेल्या वस्तूंच्या व्याख्येत सुधारणा करण्याची शिफारस केली आहे. वस्तू आणि सेवा कर परिषदेची ५५वी बैठक काल राजस्थानमध्ये जैसलमेर इथं झाली. वस्तू आणि सेवा कराशी संबंधित अनेक निर्णय या बैठकीत घेण्यात आले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि वित्त मंत्रालयाचे अधिकारी सहभागी झाले होते. बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सीतारामन म्हणाल्या की जीन थेरपीला जीएसटीमधून सूट देण्यात आली आहे. तसंच, दंड आकारणी, बँका आणि गैर-बँकींग वित्त संस्थांच्या विलंबित भरणा शुल्कावर जीएसटी लावला जाणार नाही. राष्ट्रीय कौशल्य विकास परिषदेच्या प्रशिक्षण भागीदारांना जीएसटीमधून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, परंतु अधिसूचना जारी झाल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल असंही सीतारामन यांनी स्पष्ट केलं.